Author Topic: मला वाटतं  (Read 1153 times)

Offline sonawanevs

  • Newbie
  • *
  • Posts: 1
मला वाटतं
« on: June 21, 2015, 09:16:17 AM »
मला वाटतं

रिमझिम पाऊस होऊन तुला भिजवावसं वाटत....
पहिल्या पावसातील मातीचा वास होऊन तुज्या मनाला प्रसन्न करावंसं वाटत....
चंद्र बनुन तुला शीतल प्रकाशात न्हाऊन टाकावसं वाटत....
रात्री कजवा होऊन तुला झोपेत पहावसं वाटत......
पहाटे किलबिल करुन तुला उठवावसं वाटत....
सकाळची थंड हवा बनून तुला हळूच  स्पर्श करावसं वाटत....
तू घराबाहेर आलीस की कोवळे ऊन बनुन तुला ऊब द्यावी वाटतं....
तुझ्या बागेतील फुलांचा सुगंध होऊन तुझा श्वास बनावसं वाटत......
हिरव्या डोंगरांतून खळखळणारा झरा बनून तुझ्या डोळ्यांना सुखवावसं वाटत,
कधीच न विसरणारी आठवण बनुन तुझ्या मनात राहावसं  वाटत...
आणि तुज्या ह्रुदयाचे स्पंदन होऊन तुझ्यासाठी कायमचे धडधडावसं
वाटत.....
 

कवी : विलास सोनवणे

Marathi Kavita : मराठी कविता