Author Topic: -- आज पाऊस पडतोय --  (Read 955 times)

Offline SHASHIKANT SHANDILE

  • Jr. Member
  • **
  • Posts: 349
  • Gender: Male
  • शशिकांत शांडिले, नागपुर
-- आज पाऊस पडतोय --
« on: June 22, 2015, 05:44:49 PM »
आज पाऊस पडतोय
नी मनात एक काटा रुततोय
काटा रुततोय तो तुझ्या आठवणींचा, विरहाचा

अश्याच पावसात दोघंही
गाडीवर फिरायचो, हसायचो खेळायचो
संगतीनं जगायचो
आज पाऊस पडतोय
नी मनात काटा रुततोय
मनात काटा रुततोय तो गेल्या क्षणांचा, व्याकुळ्तेचा

पावसाळा सरतांना
तुला गमावतांना आठवतो तो पाऊस
तुला दुरावतांना
आज पाऊस पडतोय
नी मनात काटा रुततोय
काटा रुततोयतो माझ्या हरण्याचा, एकटेपणाचा 

पाऊस येतो तो आजही
पण तू मात्र येत नाही म्हणूनच मला पाऊस
आपलंसं वाटत नाही
आज पाऊस पडतोय
नी मनात काटा रुततोय
काटा रुततोय तो अश्रूंनी भिजवणारा, सतावणारा

आज पाऊस पडतोय
नी मनात एक काटा रुततोय
काटा रुततोय तो असलं जगण्याचा, रोजचं मरण्याचा

शशिकांत शांडीले (SD), नागपूर
भ्रमणध्वनी - ९९७५९९५४५०
Its Just My Word's

शब्द माझे!

Marathi Kavita : मराठी कविता