Author Topic: पावसानेही थोडं भिजावं..  (Read 842 times)

ह्या पावसाने  हि  थोडं भिजावं
अगदी  तुझ्यासारखं...

तु भेटतेस तसेच भेटावं
त्याच स्पर्शाने ....

ओठांवर  तुझेच  नाव असावं तसेच त्यानेही ओरडुन सांगावं
प्रेमऋतुत ह्या फुलांनी पुन्हा फुलावं तुझ्याचसाठी....

तुलाही भेट  आठवावी मग
चिंब तु भिजताना
मी थांबवत अडवत जरा  होती तारांबळ ती माझी ....

तु सारंकाही पहावं
पुन्हा पावसानं  यावं
थोडं भिजावं अगदी  तुझ्यासारखं

पुन्हा तुला  आठवावं
पुन्हा तु भेटावं
विसरुन सारे  रुसवे

©प्रशांत डी. शिंदे....