Author Topic: रहस्य  (Read 597 times)

Offline anuswami

  • Newbie
  • *
  • Posts: 20
रहस्य
« on: June 24, 2015, 01:38:50 PM »
रहस्यप्रेम करायच नव्हत कधीच
पण भावनांची घुसमट त्याला सहवेना
जग बोल लावत तिला उगाचच
पण त्याला तिच्यावाचून काय रहावेनातिच्यासोबत बोलताना तो
उगाच बालिशपणाचा आव आणायचा
ती पण सावरून घ्यायची त्याला
कारण तो तिच्या मनीच गुपित जाणायचारंग भरायची ती तिच्या प्रेमरांगोळीत
अन हा वेडा तिला बघतच रहायचा
लाजेने लाल लाल व्हायची ती
नाही म्हणायचा पण हा तिच्या प्रेमात झुरायचातिच सहसा कुणाशी पटायच नाही
हा प्रेमवेडा मात्र तिच मन ओळखायचा
आंधळा नव्हता तिच्या प्रेमात
पण सर्वस्व अर्पणाची ती भावना मात्र जपायचाप्रेमाचे हे क्षण जपत जपत
ती त्याच्या खुप खुप जवळ आली
मनाचा उडाला गोंधळ त्याच्या
निराश होऊन ती पुन्हा दूर गेलीमध्यंतरी काही वेगळच घडल
पण त्यानं नाही तोडला तिचा विश्वास
तुटणार तरी कसा तो
जीव होता त्याचा 'ती' अन तो तिचा 'श्वास'प्रेमाचा हा लपंडाव चालू होता
पण शेवटी घडायच ते घडून गेल
इतक्या प्रेमाने सांभाळलेल हे पाखरू
काल भुर्रकन घरट्यातून उडून गेलनाशिबाला न जुमानणारा हा प्रेमाचा खेळ....
तिला आठवून हे वेडं काल रात्रभर रडलयं
कारण पावसाच्या त्या समानार्थी शब्दात........
खूप मोठ 'रहस्य' दडलयं......कवी :- अनिकेत स्वामी, अकलूज.
९५५२०३०८२८

Marathi Kavita : मराठी कविता

रहस्य
« on: June 24, 2015, 01:38:50 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):