बाप
आई घराचं मांगल्य असते ,
तर बाप घराचं अस्तित्व असतो ,
आईकडे अश्रुचे पाट असतात ,
बापाकडे संयमाचे घात असतात,
ज्योतीपेक्षा समई जास्त तापते ,
ठेच लागली की आईची आठवण येते ,
मोठ मोठी वादळे पेलवताना बाप आठवतो,
मुलीच्या स्थळासाठी उंबरठे झिजवणारा बाप,
घरच्यांसाठी व्यथा दडपवणारा बाप,
मुलींवर जास्त प्रेम बापाचे असते
मुलगी बापाला जाणते
किती ग्रेट असतो ना बाप !
सौ. संजीवनी संजय भाटकर