Author Topic: कुणास ठाऊक का होतं प्रेम ????  (Read 1011 times)

Offline NitinSK

  • Newbie
  • *
  • Posts: 3
अशीच एक आवडलेली कविता
कवी....श्री.शिव.एस.के...

कुणास ठाऊक का होतं प्रेम ????

का एखादा चेहरा
जातो ह्रृदयाची तार छेडुन
का हरवून जातं मन त्याच्यात
सा-या जाणीवांचं भान सोडून ???

तसं नातं काहीच नसतं त्या चेहऱ्याशी आपलं
तरीसुद्धा का धावत जातं मन
त्याच्याकडेच .....
सा-या मर्यादांचा बांध फोडून ???

आपणांस ठाऊक असतं, समोर दिसतंय .....
ते आहे फक्त एक मृगजळ.....
तरीसुद्धा जगत राहतो स्वप्नांच्या दुनियेत...
अजस्त्र वास्तवाचा विचार सोडून ...

अनुभवी जग सांगत असतं ओरडून
सावकाश... पुढे धोका आहे रे बाबा....
तरीसुद्धा का नाही राहत ???
स्वतःच्या मनावर स्वतःचा ताबा .....
कुणास ठाऊक का होतं प्रेम ????
सा-या जगाचे निर्बंध तोडून .....
....
 कुणास ठाऊक का होतं प्रेम ????
सा-या जगाचे निर्बंध तोडून ...