Author Topic: एक हात सुटला म्हणून काय झालं एक डाव मोडला म्हणून काय झालं  (Read 634 times)

Offline sammadival

  • Jr. Member
  • **
  • Posts: 75
  • Gender: Male
  • somnath madival
एक हात सुटला
म्हणून काय झालं
एक डाव मोडला
म्हणून काय झालं
तू प्रेम केलं होतं
प्रेमाचच भाग्य होतं
कुणीतरी तोडून गेलं
त्याचं नशीब खोटं होतं
कुणावरी प्रेम जडतं
वेड स्वप्न जागं होतं
तन मन मोहरून
कोसळणारं आकाश होतं
कुठेतरी काहीतरी पण
नकळे काय चुकत
वाऱ्यावर बांधलेलं
स्वप्न विरून जातं
तो गेला तरी पण
प्रेम मागंच उरतं
कारण काही झाल तरी
ते प्रेम आपलच असतं
आपलं प्रेम आपणच
सांभाळायचं असतं
तुटलं फुटलं वाटलं तरी 
सदैव अभंग असतं
प्रत्येक प्रेमाला लायक
कुणी तरी असतो
कधी लवकर कळतो
कधी उशिरा कळतो
जे हृदय प्रेम शोधतं
त्याला ते नक्की मिळत
तुझं प्रेम फक्त तू
कोंडून ठेवू नकोस
येईल कुणी तुझ्यासाठी
विश्वास हरवू नको

सोम मडिवाल
पुणे
9762282827