Author Topic: तू गेल्याचे दु:ख नाही मला  (Read 1085 times)

Offline sammadival

  • Jr. Member
  • **
  • Posts: 75
  • Gender: Male
  • somnath madival
तू गेल्याचे दु:ख नाही मला,
पण ??
माझी किंमत एक दिवस कळेल
 तुला..आयुष्यात माझी उणीव
 नेहमीचं जाणवेल,
पण ??
ती भरण्यास तेव्हा मी मात्र
 नसेन..
मला भेटण्यास खुप तडफडशील
 जेव्हा तू एकटी पडशील,
पण ??
त्या एकटेपणात माझी साथ
 मात्र नक्कीच नसेल..
माझ्यासाठी बरेचं अश्रू
 वाहशील
 जेव्हा माझे स्मरण करशील,
पण ??
तुझे अश्रू झेलणारे तळहात मात्र
 माझे नसतील..
ठेचं लागून खाली पडशील
 जेव्हा माझ्या विरहाने व्याकूळ
 होशील,
पण ??
तेव्हा तुला सावरणारे हात मात्र
 माझे नसतील..
भयाने तू घायाळ होशील
 जेव्हा कधी संकटात पडशील,
पण ??
तुला धीर देणारे बोल मात्र माझे
 नसतीजीवनाला कंटाळून
 जाशील
 जेव्हा सगळे दरवाजे बंद होतील,
पण ??
तुझ्यासाठी तळमळणारे हृदय
 मात्र
 तेव्हा माझे नसेल..
नजर शोधत राहील फक्त मलाचं
 जेव्हा तू या जगाचा निरोप घेत
 असशील,
पण ??
त्यावेळी तुला भरभरून
 पाहणारेडोळे
 मात्र माझे नसतील..
तू गेल्याचे दुःख नाही मला,
माझी किंमत एक दिवस कळेल
 तुला..
पण ??
तोपर्यंत खूप उशीर झाला असेलयापुढे मीचं या जगात नसेल..ल..