Author Topic: घेत होतो फक्तं श्वास आजपर्यंत  (Read 1006 times)

Offline Ashish Patil

  • Newbie
  • *
  • Posts: 10
घेत होतो फक्तं श्वास आजपर्यंत
खऱया जीवनाची सुरूवात आज झाली
होतो नैराश्याच्या वाटेवर मी नेहमी
ती वाट आज माझ्यापासून दूर झाली
होतं फक्त शरिर अस्तित्वात
आज मनही माझं जीवंतं झालं
पाहिलं स्वप्नं मी पहिल्यांदा झोपतांना
जेव्हा पासून मी तूझं गोड हसणं पाहिलं
येतेस माझ्या समोर तू जेव्हा केव्हाही
तेव्हा तूला बोलायची हिंमत होत नाही
वाटतं न बोलता का तू माझ्या
भावनां समजून घेत नाही
नाही सहन होत आता दुरावा तुझ्यापासून
तूही माझ्यापासून दूर राहू नकोस
बनली आहेस तू माझ्या कारण जगण्याचं
आता तूच माझ्या मरणाचं कारण बनू नकोस
आता तूच माझ्या मरणाचं कारण बनू नकोस