Author Topic: मन मात्रा वजा आहे..  (Read 692 times)

Offline rajeshreekamble

  • Newbie
  • *
  • Posts: 25
मन मात्रा वजा आहे..
« on: July 16, 2015, 04:27:38 PM »
स्पर्शाच्या त्या शहार्याचा..
अनुभव अजुन ताजा आहे..
मी आहे इथेच कधीची..
मन मात्रा वजा आहे..

पूर्णविरामता त्या वाक्याची..
अजुन करते इजा आहे..
मी आहे इथेच कधीची..
मन मात्रा वजा आहे..

अस्तित्वाला झाली जखम..
प्रेमाची ही सजा आहे..
मी आहे इथेच कधीची..
मन मात्रा वजा आहे..
--राजश्री

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
Re: मन मात्रा वजा आहे..
« Reply #1 on: July 16, 2015, 06:39:43 PM »
खुपच छान :)