Author Topic: आठवण तुझी येता  (Read 1461 times)

Offline pilu patil

  • Newbie
  • *
  • Posts: 4
आठवण तुझी येता
« on: July 17, 2015, 10:11:23 AM »
नाते न जुळले जरी
पिया तुझे नि माझे
 आठवण तुझी येता
मन का उदास होते॥ऽ॥

आठवण तुझी येता
मी सारं काही विसरते
तुझ्या स्वप्नील डोळ्यांतील
स्वप्न होऊन जगते ॥ऽ॥

आठवण तुझी येता
मी रात्र रात्र जागते
तुझ्या आठवणी कुरवाळत
उगीच कूस बदलत राहते ॥ऽ॥

तु न झालास माझा
हे स्वीकारले जरी
आठवण तुझी येता
मी तुझ्यात गुंतत जाते ॥ऽ॥

न उमगले कधीही
हे असे का घडते
पण आठवण तुझी येता
मी न माझी उरते ॥ऽ॥

                     - PILU NI3 PATIL.

Marathi Kavita : मराठी कविता