Author Topic: प्रेमाचा प्रस्ताव  (Read 776 times)

Offline mangeshmore111

  • Newbie
  • *
  • Posts: 4
प्रेमाचा प्रस्ताव
« on: July 18, 2015, 05:43:30 PM »
प्रेमाचा प्रस्ताव नाही  मांडत समजून घे......

मी प्रेम तुझ्यावर नाही  करत
मांडून घे
प्रेमाचा प्रस्ताव नाही मांडत
समजून  घे

तू नसताना आठवण तुझी येते
तुझ्या निख्खळ हसण्याची साठवण मनात  होते
मग माझच मन मला म्हणते
तो गोड चेहरा मनात साठवून घे
मी प्रेम तुझ्यावर नाही  करत
मांडून घे
प्रेमाचा प्रस्ताव नाही मांडत
समजून  घे

झोपताना प्रिये तुझेच विचार मनात असतात
जरी खुले असले तरी नयन माझे फसतात
मग माझच मन मला म्हणते
रताळ्या स्वप्नात हव तेवढ बघून घे
मी प्रेम तुझ्यावर नाही  करत
मांडून घे
प्रेमाचा प्रस्ताव नाही मांडत
समजून  घे

कळत नाही  मी का म्हणत आहे
मी प्रेम नाही करत
माझ मन एवढं
कशामुळे आहे झुरत
मग माझच मन मला म्हणते अरे वेड्या
तू प्रेम तीच्यावर करतो
हे हृदयावर कोरून घे
तू प्रेम तीच्यावर खुप करतो
मांडून घे
तू प्रेमाचा प्रस्ताव आहे मांडत
समजून घे

अस रोज रोज घडत ग
मन माझ रोजच तडपत ग
मग माझच मन मला म्हणते
एकदा तरी तीला
विचारुन घे
मी प्रेम नाही करत
मांडून घे
प्रेमाचा प्रस्ताव नाही मांडत
समजून घे

उफ आता तरी सर्व कळले असेल
सांगितलेले सर्व वळले असेल
आता तरी होकार देशील
नाहीतर मन माझ मलाच म्हणेल
तीच्यावीना जगणं आता तू शिकून घे
मी प्रेम तुझ्यावर नाही केलं
मांडून घे
प्रेमाचा प्रस्तावही नाही मांडला
समजून घे........

Marathi Kavita : मराठी कविता