Author Topic: अजून त्याला ही जगू दे  (Read 633 times)

Offline शितल

  • Jr. Member
  • **
  • Posts: 137
  • Gender: Female
  • हळुवार जपल्या त्या भावना….
अजून त्याला ही जगू दे
« on: July 19, 2015, 06:35:26 PM »
कोंडलेल्या पाखराला
श्वास मोकळा मिळु दे
पंख पसरुनी नभात साऱ्या
अजून त्याला ही जगू दे

रोप चिमुकले माती मधले
त्यास जरासे फुलू दे
मायेच्या या स्पर्शामध्ये
अजून त्याला ही जगू दे

प्रेमासाठी आसुसलेल्या
नजरेला ती नजर जुळू दे
होऊन बेभान प्रेमात त्या
अजून त्याला ही जगू दे


शितल ………

Marathi Kavita : मराठी कविता