Author Topic: तू ही कधी नकळत माझ्या प्रेमात पडला असशील .........  (Read 1549 times)

Offline शितल

  • Jr. Member
  • **
  • Posts: 137
  • Gender: Female
  • हळुवार जपल्या त्या भावना….
समजवताना स्वताःला
तू ही कधी थकला असशील
विसरण्याच्या प्रयत्नात
मलाच सतत आठवत असशील
माझ्या सुखासाठी स्वताःशीच
कधी रुसला असशील
तू ही कधी नकळत
माझ्या प्रेमात पडला असशील

आठवणीत माझ्या रमताना
एखादी रात्र जागला असशील,
पाहून मला येताना
तू ही थोडा सुखावला असशील,
धडधडणाऱ्या हृदयाशी
एकांतात भांडला असशील,
तू ही कधी नकळत
माझ्या प्रेमात पडला असशील

दुरावताना हात हातातील
तू ही थोडा दुखावला असशील,
अश्रू माझे पाहून
तू ही मनात गहीवरला असशील,
"आयुष्य माझं तूच" म्हणताना
थोडसं तरी रडला असशील,
तू ही कधी नकळत
माझ्या प्रेमात पडला असशील


शितल ……