Author Topic: तू आणि मी  (Read 1426 times)

Offline rajeshreekamble

  • Newbie
  • *
  • Posts: 25
तू आणि मी
« on: July 20, 2015, 03:48:19 PM »
मी नेहमीच गाळली होती माझ्या शब्दांची बोली
तुला ती कळणार कशी,
सरळ जाणारी सरळच रेषा,
मधूनच वळनार कशी..

माझ्या प्रीतीचा बांध मी कधी तोडला नाही,
तू ही तुझा झरा,
माझ्या दरीशी जोडला नाही..

अपुरेच होते सारे तुझया वाचून माझे
मी कधी पुरी झाले नाही,
आणि तू अपुरा राहिला नाहीस...

--राजश्री
« Last Edit: July 20, 2015, 03:49:17 PM by rajeshreekamble »

Marathi Kavita : मराठी कविता