Author Topic: प्रवास  (Read 738 times)

Offline rajeshreekamble

  • Newbie
  • *
  • Posts: 25
प्रवास
« on: July 20, 2015, 04:25:20 PM »
मी चन्द्राला झूरतांना पाहीले होते,
भाव मनातले मनातच राहीले होते,

त्या क्षणांचा झाला निर्मळ झरा,
मी माझे मन त्यात वाहीले होते,

तुझ साठी असेल साधा प्रेमाचा डाव,
त्या खेळा मधे मी आयुष्य हरले होते,

मी नसेल केला त्रागा तुझया नसण्याचा,
पण त्रास नाही झाला असे ही नव्हते,

तू समोर असताना बोलले नाही,
शब्दांच्या गुंत्यात अडकून मीच वावरत होते,

वर्तुळा परी झाला हा प्रवास,
जेथून सुरू तीथेच येउनि थांबले होते,

--राजश्री

Marathi Kavita : मराठी कविता