Author Topic: अथांग माझ्या सागराला  (Read 770 times)

Offline rajeshreekamble

  • Newbie
  • *
  • Posts: 25
अथांग माझ्या सागराला
« on: July 20, 2015, 04:36:15 PM »
शोधत होते खूप, पण भेटला ना निवारा,
अथांग माझ्या सागराला भेटला ना किनारा..

शब्दांच्या झाल्या ओळी, त्यात मनातला निखारा,
अथांग माझ्या सागराला भेटला ना किनारा.

वाट पाहते मन, तुझ्या चाहुलीचा इशारा,
अथांग माझ्या सागराला भेटला ना किनारा..

सरताना राहिला, तुझया आठवणींचा सहारा,
अथांग माझ्या सागराला भेटला ना किनारा..

--राजश्री

Marathi Kavita : मराठी कविता