Author Topic: वेडा  (Read 682 times)

Offline Bhalchandra

  • Newbie
  • *
  • Posts: 2
वेडा
« on: July 22, 2015, 01:20:26 AM »
वेडाच होतो  मी कदाचित

जे तुला स्वतःमधे शोधत होतो
स्वतःशीच तुझ्यासाठी भांडत होतो

सैरवैर पळत होतीस तू तुझ्या स्वप्नामागे
आणी मी  बुद्दीबळाच्या राजा सारखा एकेकच पाऊल  चालत होतो

तुझ्या रागाला काळजी आणि रुसव्याला प्रेम  समजत होतो 
आणि स्वतःला  हरून प्रत्येक वेळी तुला जिंकवत होतो
 
वेडाच होतो मी कदाचित

Marathi Kavita : मराठी कविता