Author Topic: पलीकडून फक्त पाऊसच ऐकू येतो  (Read 788 times)

Offline sachin_sawant

  • Newbie
  • *
  • Posts: 12
  • Gender: Male
भरगच्च भरलेल आभाळ पाहून
पाऊस येतो मनामधे दाटून

आतुरलेले थेंब साचतात मौनावरती
अनोळखी शब्द सुचतात ओल्या रस्त्यावरती

 खिडकीपाशी रेंगाळता रेंगाळता
काचेवर ओला ओरखडा पडतो

अधीरतेने मी तुला फोन करतो
पलीकडून फक्त पाऊसच ऐकू येतो

पलीकडून फक्त पाऊसच ऐकू येतो

- सचिन सावंत