Author Topic: मन  (Read 1318 times)

Offline Sona_sush

  • Newbie
  • *
  • Posts: 3
मन
« on: July 23, 2015, 12:25:18 PM »
मन हे असच असत
कुणाच हळवं , कुणाच कठोर
मन हे असच असत . .

जे हव ते मिळाल कि समाधानी नसत
कायम जास्त आशा बाळगत असत
मन हे असच असत . .

जवळची व्यक्ती सोबत नसली कि अस्वस्थ असत
सोबत असली कि नकळत खुश असत
मन हे असच असत . .

प्रेमाची भाषा माहित नसली तरी
जीवापाड प्रेम हे करत असत
मन हे असच असत . .

-- सोनाली सुशांत बिर्जे

Marathi Kavita : मराठी कविता