Author Topic: फक्त तुझी सावली....होती  (Read 1278 times)

Offline dattarajp

  • Jr. Member
  • **
  • Posts: 131
फक्त तुझी सावली....होती

तुझ्या त्या सावली मधे
ही प्रेम होते.
तुजला हे कळत नव्हते.
प्रेम तुला होत होते.

तू नाही मिळाली तरी,
तुझी सावली भेटत होती.
तुझ्या सावलीस माझी सावली,
मिठीत सदा घेत होती.

तुझ्या सावलीस माझी सावली,
काही तरी बोलत होती.
तुला ही हे सांग म्हणत होती.
पण ती सावली ना ऐकत नव्हती.

माझ्या सावलीस तुझी सावली,
अंधारात सोडुन जात होती.
माझे मन हे ती तोडून जात होती.
मजला ही ती दिसत नव्हती.

कारण ती दूर गेली होती.
सोबत तीची ती सावली होती.
जी मला भाळली होती.
ती फक्त तुझी सावली होती.

                  बबलु
           9623567737