Author Topic: नाही केली जी गोष्ट आजपर्यंत मी  (Read 1673 times)

Offline Ashish Patil

  • Newbie
  • *
  • Posts: 10
नाही केली जी गोष्ट आजपर्यंत मी
ती गोष्ट आज मला करायची आहे
ये फक्त तू, एकदा समोर माझ्या
तुझ्या नजरेला नजर देऊन बोलायच आहे........
किती दिवस माझे तुला लपून पाहण्यात गेले
सगळ्यांसोबत तू किती छान हसायची
मग आलोच चुकून जेव्हा समोर मी तुझ्या
का तू तुझं हसन असं मध्येच थांबवायची......
चुका तर जीवनात प्रत्येकाकडून होतात
माझी चूक एवढी मोठी तर नव्हती
नाहीतर सांग एक दिवस भेटून तू मला
तुझ्याशी बोलायची माझी लायकीच नव्हती.....
किती सारया रात्री तुझ्या आठवणीत गेल्या
पण एक गोष्ट शेवटपर्यंत समजलीच नाही
ज्या चुकांमुळे माझ्यापासून तू नेहमी दूर राहायची
ती चूक आजपर्यंत समजलीच नाही.....
सरकली असशील तू तुझ्या जीवनात पुढे
पण आजही तुझ्या आठवणीत जगात आहे मी
रात्रीच अर्थ माझ्या कसा मी सांगू
फक्त तोंडावर पांघरून घेऊन रडत आहे मी.....
फक्त तोंडावर पांघरून घेऊन रडत आहे मी.....