Author Topic: प्रेमाची परिभाषा  (Read 1154 times)

Offline Mangesh Kocharekar

  • Jr. Member
  • **
  • Posts: 95
प्रेमाची परिभाषा
« on: July 26, 2015, 01:23:22 PM »
प्रेमाची परिभाषा नवखी जरी मलाही
मी वाहवत ण गेलो शिकलो बरेच काही
  झालो न मी दिवाणा केली ण काही घाई
  प्रीतीत रंग भरण्या ण केली कसूर काही
समजून घेत तिजला मी केली मला मनाई
ना उतावीळ झालो यात दोघांची होती भलाई
  र्हिदय कसे जिंकावे ?मज याची समजही नाही
  उठे रोमांच अंतरी या मज प्रेमाची वाटे नवलाई
अभिप्रेत मज कधी नव्हते आकर्षण सजावटीचे
मज अभिजात वेड होते सच्च्या खुल्या मनाचे
  भूलाण्यास नवटंकीला मी प्रेमरोगी नाही
सच्या खुल्या मनाचा मी जपेन शब्द अंतरीही   
Marathi Kavita : मराठी कविता