Author Topic: पुतळा बनुन रहायचे ...  (Read 726 times)

Online श्री. प्रकाश साळवी

  • Jr. Member
  • **
  • Posts: 229
  • Gender: Male
  • कवी प्रकाश साळवी
पुतळा बनुन रहायचे ...
« on: July 27, 2015, 04:30:25 PM »
पुतळा बनुन रहायचे....
तुला फक्त शांत बसायचे आहे
एखाद्या पुतळ्या सारखे
निस्तब्ध, निश्चल, अविचल
असे कितीक कावळे येतिल
जातीलही, तुझ्या डोक्यावर बसतिल
हालायचे नाही डूलायचे नाही
संयंम मात्र सोडायचा नाही
विष्टा करतील अंगावर !!
फक्त शांत रहायचे
एखाद्या "स्थितप्रज्ञा" सारखे
ऊन्हात तापायचे आहे,
पावसात चिंब भिजायचे आहे
थंडित कुडकुडायचे आहे
कुणितरी चिल्लर येईल
तिथलेच गटारातले तरपट
टाकिल तूझ्या अंगावर
घाबरायचे नाही
शांत शांत आणि शांत
कारण...एक दिवस
तुझे चाहते येतील
आणि ऊजळून टाकतील
तूझे जिवन
स्वच्छ सुंदर
गंगेच्या पाण्यासारखे
निर्मळ.!!!

प्रकाश साळवी

Marathi Kavita : मराठी कविता