आठवणीत तुला साठवायच राहून गेल...
विसर कधि पडलीच नाही म्हणुन आठवायच राहून गेल...
मनाच्या कोपर्यात नाही , तू नेहमी डोळ्यांसमोर असतेस माझ्या...
निवांत कधी फोटो सुद्धा पहायचा राहून गेल..
तू मला माझ्यापासून वेगळी वाटलीच नहीं कधि..
क्षणिक अंतर सुद्धा पाळायच राहून गेल..
एकट कधि रहाव लागेल अस माहितच नव्हत..
साथ दुसरा शोधायचा राहून गेल..
स्वतःची आवड सुद्धा माहित नव्हती..
माझ्यातला मी शोधायच राहून गेल..
क्षणा क्षणात एक काळ निघुन गेल..
वलून एकदा माघे पहायच राहून गेल..
स्वप्नांचा अंत कधी आखलाच नहीं..
डोले मिटून साथ तुझा अनुभवायच राहून गेल..
तू गेलीस.. दूर.. खुप दूर..
तरी पण..
होत प्रेम... आहे... पुन्हा प्रेम करायच राहून गेल...
-Chottya
(आपली प्रतिक्रिया माझ्या लिखाणाची प्रेरणा आहे...)
