Author Topic: प्रिये तुझी आठवण  (Read 1241 times)

Offline santosh narve

  • Newbie
  • *
  • Posts: 1
प्रिये तुझी आठवण
« on: July 31, 2015, 01:00:30 PM »
प्रिये तुझी आठवण क्षणाक्षणाची साठवण
तुझं गोड हसणं तुझं गोड दिसणं
प्रेमल तुझं बोलणं अन सुंदर तुझं हसणं
प्रिये तुझी आठवण माझ्या ह्रदयाची गोठवणं

प्रिये तुझी आठवण एका नव्या वादळाची उगवणं
तुझ्या नसण्यात असणं शुद्ध मनाची फसवणं
प्रिये तुझी आठवण एका अमूल्य ठेव्याची जपणूक
प्रिये तुझी आठवण मनाची अस्वस्थाता अन् जीवाची तगमग

प्रिये तुझी आठवण जशी नदीची खळखळ
शांत असलेल्या पाण्याची त्यात पडलेल्या दगडाची ओळख
प्रिये तुझी आठवण मुक्त सुगंधाची उधळण
प्रिये तुझी आठवण भिरभिरणाय्रा गरूडाची आकाशाला गवसणं

प्रिये तुझी आठवण जशी मध्यरात्र ही सुनसाण
प्रिये तुझी आठवण तुझी प्रीती माझ्या मन मन
प्रिये तुझी आठवण सरल्या दिवसाची उतरण
विसरता तूला उडालेली माझ्या मनाची गं घसरणं


« Last Edit: July 31, 2015, 01:02:44 PM by santosh narve »

Marathi Kavita : मराठी कविता