Author Topic: अव्यक्त मन...  (Read 1113 times)

Offline Devendra Isalkar

  • Newbie
  • *
  • Posts: 1
अव्यक्त मन...
« on: August 03, 2015, 07:11:08 PM »
बोलत
ती पण नाही,
बोलत
मी पण नाही
प्रेमात पडणे तिला जमत नाही,
आणि माझा तिला त्रास मला पटत नाही.
बोलत
ती पण नाही,
बोलत
मी पण नाही....
तिला रुसण्याचे दु:ख
आहे,
मला एकटेपणाची
भीती आहे....
समजत...
ती पण नाही,
दाखवत.....
मी पण नाही......
कुठल्यातरी वाटेवर
भेट होत असते नेहमी
बघत...
ती पण नाही,
थांबत...
मी पण नाही....
जेव्हा पण बघतो तिला,
ठरवतो काहीतरी
बोलेन तिच्याशी....
ऐकत..
ती पण नाही,
सांगत..
मी पण नाही....
पण गोष्ट माञ खरी आहे स्वप्णात घर आहे तिचे
माझ्या नाकारत ..
ती पण नाही,
सांगत...
मी पण नाही....... कविता:- देवेंदृ इसलकर

Marathi Kavita : मराठी कविता