Author Topic: तू नसताना ...........  (Read 2918 times)

Offline विजय वाठोरे सरसमकर

 • Jr. Member
 • **
 • Posts: 136
 • Gender: Male
 • विजय वाठोरे सरसमकर
तू नसताना ...........
« on: August 05, 2015, 09:02:46 AM »
             तू नसताना ...........


तू नसताना नाही काढत मी तुझी आठवण
फक्त थांबत असतात ते सर्व क्षण
आणि मंद होत जातात या हृदयाचे ठोके
तेव्हा वाटतं माझ्यासोबतच का होत अस विलक्षण

तू नसताना मी करत नसतो तुझी साठवण
कारण तेव्हा माझ हृद्यच नसत जाग्यावर
आणि ते भटकत असत सैरावैरा
तेव्हा अस भासतं ते असत तुझ्याच पावलांच्या मागावर

तू नसताना मी घाबरत नसतो कश्यालाही
फक्त काळजी असते तुझ्या प्रीतीची
मग नसते कुठलीही भावना मनात
असते फक्त आस तुझ्याच भेटीची

तू नसताना करत नसतो मी कवितांची रचना
तुझा विरह असतानाही फक्त शब्दच देतात साथ
आणि तुझाच विषय घेऊन येतात माझ्या मनात
आता एकच आशा शब्दांऎवजी तूच द्यावी मला साथ

                                          विजय वाठोरे सरसमकर
                                            9975593359 

Marathi Kavita : मराठी कविता


sayali pawar

 • Guest
Re: तू नसताना ...........
« Reply #1 on: August 06, 2015, 10:29:46 AM »
मला खूप आवडली हि कविता ..................
................
..................
..................माज्यासाठीही  एक कविता    कराल काय
विजय सर ................................

laxman bhalke

 • Guest
Re: तू नसताना ...........
« Reply #2 on: August 12, 2015, 08:09:57 AM »
briliant things yaar
i'm just love this poem.....

Offline विजय वाठोरे सरसमकर

 • Jr. Member
 • **
 • Posts: 136
 • Gender: Male
 • विजय वाठोरे सरसमकर
Re: तू नसताना ...........
« Reply #3 on: September 01, 2015, 06:29:32 PM »
सायली नक्कीच बनवेल तुमच्यासाठी एक कविता ....................................
 .............लक्ष्मन तुमचे खूप खूप धन्यवाद !