Author Topic: शब्दात सारे सांगू कशाला?  (Read 1681 times)

Offline शितल

  • Jr. Member
  • **
  • Posts: 137
  • Gender: Female
  • हळुवार जपल्या त्या भावना….
शब्दात सारे सांगू कशाला?
नजरेची भाषा कळते ना त्याला
समजून सारं तो शांत आहे
समजून सारं तो शांत आहे
तळमळ जीवाची ती माझी कशाला?
शब्दात सारे …….

नभी सूर्य आहे
तो ढग ते हि पाहे
ते सावलीचे जगणे
सारेच व्यर्थ आहे
त्या जगण्याचा अर्थ मी लावू कशाला?
समजून सारं तो शांत आहे
तळमळ जीवाची ती माझी कशाला?
शब्दात सारे …….

अशी ओढ आहे
भेटीस धावू पाहे
अडकलेले पाऊल
रक्तात ओले आहे
त्या जखमांची पर्वा आता करते कशाला?
समजून सारं तो शांत आहे
तळमळ जीवाची ती माझी कशाला?
शब्दात सारे …….

नको ना …… नको ना ……
दुः खाचा तो कोना
प्रेमाचा उसासा
जीवाला या देना
या वेड्या मनाला मी कोंडू कशाला?
समजून सारं तो शांत आहे
तळमळ जीवाची ती माझी कशाला?
शब्दात सारे ……


शितल ……

Marathi Kavita : मराठी कविता


Offline maheshkarpe4

  • Newbie
  • *
  • Posts: 25
Re: शब्दात सारे सांगू कशाला?
« Reply #1 on: September 03, 2016, 11:42:10 PM »
Khupach chaan kavita ahe hi tumchi.... Faar avadli.... Mast