Author Topic: सोबतीला माझ्या या फक्त चार ओळी  (Read 1179 times)

Offline शितल

  • Jr. Member
  • **
  • Posts: 137
  • Gender: Female
  • हळुवार जपल्या त्या भावना….
किती झेलले ते दुखः उन्हाळी
तरी डोळ्यांत या प्रतिमा ती ओली
ना माझे कुणी, ना मी कोणाची झाली
सोबतीला माझ्या या फक्त चार ओळी   

दिशाहीन वाटे ही दुनिया सारी
या दुनियेची भाषा, ती रीतचं निराळी
ना माझे कुणी, ना मी कोणाची झाली
सोबतीला माझ्या या फक्त चार ओळी

ती सुंदर स्वप्ने, ते प्रेमात जगणे
सोडून तो ही गेला, सारं एकेकाळी
ना माझे कुणी, ना मी कोणाची झाली
सोबतीला माझ्या या फक्त चार ओळी


शितल …….

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Archana...!

  • Newbie
  • *
  • Posts: 43
  • Gender: Female
खुप छान शीतल....  :)