Author Topic: सुंदर काही तरी लिहायच होत,तुझ्या कवितांत रमायच होत  (Read 1191 times)

Offline shrikrushna Gaikwad

  • Jr. Member
  • **
  • Posts: 71
  • Gender: Male
सुंदर काही तरी लिहायच होत
तुझ्या आठवनीत अडकायच होत
तु नाही भेटली मग काय झाल
तुझ्या कवितांत रमायच होत

सुंदर काही तरी बघायच होत
बघुन तुला, चंद्राला विसरायच होत
चांदनीला ,तुझ्या स्वप्नासाठी तोडायच होत
तुझ्या स्वप्नांसाठी जगायच होत

सुंदर विश्व बनवायच होत
छोट घरकुल बनवायच होत
तुझ्या माझ्या संसारात रमायच होत
सर्व जगाला विसरायच होत

सुंदर स्वप्न बघायच होत
स्वप्नात तुला भेटायच होत
माझ प्रेम तुला सांगायच होत
स्वप्न तुटण्या अगोदर उठायच होत

सुंदर कविता लिहायची होती
माझ प्रेम त्यात लिहायच होत
कविता तुला द्यायची होती
तुला माझ करायच होत

श्रीकृष्णा गायकवाड(shri) नाशीक
Replay on
Mail-shrikrishnsk@gmail.com