Author Topic: जगणे फार सुंदर असते ……  (Read 1095 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
जगणे फार सुंदर असते ……
« on: August 08, 2015, 08:49:33 PM »


अर्धे टक्कल केस पांढरे
अरे माझे प्रेम लाजरे

गुढगे सुजले पोट सुटले
परी चांदणे मनी सजले

कालच माझा मित्र वारला
माझा जीव इथेच अडकला

बोटावरती वर्ष राहिली
परी स्वप्ने नाही मिटली

म्हणोत तृष्णा कुणी तिला
म्हातारचळ अथवा लागला

अरे होवू दे जे होते ते
जगणे फार सुंदर असते

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


Marathi Kavita : मराठी कविता