प्रेम नसतं साधं-सोपं........
प्रेम नसतं साधं-सोपं
त्यात नसतं कोणतही लक्षण खोट
त्यास जिंकण्या द्याव लागत बलिदान
आणि हवं असत ते काळीज मोठ !
प्रेम नसतं एक वादा कधी
ते असत निर्भर फक्त विश्वासावर
त्यात द्यावा लागतो एकमेकांना उबारा
घेउनी प्रीतीची साद असाव लागत एकमेकांच्या मागावर !
प्रेम नसतं वाट पाहाणं
ते असत साथीदाराला मरेपर्यंत साथ देणं
प्रेमात नसतो कधी विश्वासघात
ते असत सोबत राहून प्रत्येक संकटावर मात करणं !
विजय वाठोरे(साहिल) सरसमकर
9975593359