Author Topic: माझं राहिलं नाही..  (Read 1133 times)

Offline sammadival

  • Jr. Member
  • **
  • Posts: 75
  • Gender: Male
  • somnath madival
माझं राहिलं नाही..
« on: August 26, 2015, 12:13:24 PM »

व्हायचं ते होऊन गेलं घडायचं ते घडून गेलं,
कळत नाही कसं पण मन प्रेमात पडून गेलं,
कळलं नाही मलाही कधी हातून निसटून गेलं,
तू भेटलीस अन मला सोडून गेलं,
कधी तुझ्या डोळ्यांत मन हरवत गेलं,
कधी तुझ्या केसांत मन गुंतत गेलं,
विचारलं तेव्हा मनाला हे काय चाललं,
तुला काही कळत नाही इतकचं मला म्हटलं,
माझचं मन माझ्याकडे ढुंकूनही पहात नाही,
तू नाद लावलास त्याला आता ते माझं राहिलं नाही..

सोम
9762282827

Marathi Kavita : मराठी कविता