Author Topic: प्रेमसंदेश  (Read 1879 times)

Offline sachinikam

  • Jr. Member
  • **
  • Posts: 162
  • Gender: Male
प्रेमसंदेश
« on: August 28, 2015, 03:21:12 PM »
प्रेमसंदेश

विसरेन कसा तुझा चेहरा
शब्दांनी रेखाटलंय चित्र
आठवणीवर ठेवलाय पहारा
तूच सुहृद तूच मनमित्र

सांगायचे आहे बरेच काही
पण प्रत्यक्ष भेटल्यावर
गुपीत आता उरलच नाही
डोळ्यांत तुझ्या पाहिल्यावर

वेळोवेळी केला धावा
तुझ्याच मिलनाचा
उडाला पाखरांचा थवा
घेउनि संदेश प्रेमाचा
-------------------------------
कवितासंग्रह : मुकुटपीस
कवी : सचिन निकम
पुणे
९८९००१६८२५
sachinikam@gmail.com
-------------------------------

Marathi Kavita : मराठी कविता


Offline sachinikam

  • Jr. Member
  • **
  • Posts: 162
  • Gender: Male
Re: प्रेमसंदेश
« Reply #1 on: February 01, 2016, 04:05:37 PM »
उडाला पाखरांचा थवा
घेउनि संदेश प्रेमाचा...