Author Topic: काय असत प्रेम ?  (Read 1705 times)

Offline Shri_Mech

  • Newbie
  • *
  • Posts: 48
  • Gender: Male
  • प्रेमात लक्षात ठेवण्यापेक्षा विसरणं अवघड असतं
काय असत प्रेम ?
« on: September 02, 2015, 04:24:11 PM »
काय असत प्रेम ?
जे वाईट कामापासून परावृत्त करत ते कि
जे वाईट काम करायला लावत ते,

काय असत प्रेम ?
जे मरणापासून खेचून आणत ते कि
जे जगण असह्य करून टाकत ते,

काय असत प्रेम ?
जीवन आनंदाने भरून टाकत ते कि
जे जीवनमार्गात काटे पेरत जात ते,

काय असत प्रेम ?
कायमच एका हव्याहव्याशा बंधनात बांधत ते कि
इतर सर्व नात्यांची बंधन सैल करायला लावत ते,

खरच, काय असत प्रेम ?
Shri_Mech

Marathi Kavita : मराठी कविता