Author Topic: एक स्वप्न  (Read 1767 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
एक स्वप्न
« on: September 03, 2015, 10:23:07 PM »

एक स्वप्न
डोळ्यासमोर
वावरतांना दिसते
क्षणोक्षणी
मन नाचरे
फुलपाखरू होते
स्पर्श करण्या
जावे तर
दूरवर पळते
अन दुरावता
दिवसभर
पंख मोडून पडते
काय म्हणू
या वेडेपणाला
मजला न कळते
मरगळलेल्या
जगण्याला
कारण एक मिळते

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


Marathi Kavita : मराठी कविता