Author Topic: कळत होत मला..  (Read 2089 times)

Offline महेंद्र

  • Newbie
  • *
  • Posts: 2
कळत होत मला..
« on: September 04, 2015, 09:21:31 PM »
कळत होत मला
मन भरकटत होत म्हणून
अज्ञान बनून बसलो
सांगड घालत मनाशी...

कळत होत मला
नजरेत तिच्या आहे
फक्त न फक्त विश्वासघात
अन आहे बरबादी...

कळत होत मला
बोलण्यात तिच्या आहे
सुमधुर विषवाणी पण
झालो होतो अडाणी...

कळत होत मला
स्वप्न मागे पडतायेत
ध्येय दूर जातायेत
आपले दुरावतायेत

कळत होत मला
घात करतेय
खूप छडतेय
ह्दय तोडतेय

कळत होत मला
कळत होत मला.....

महेंद्र बाविस्कर ९०४९८७६२०७

Marathi Kavita : मराठी कविता