Author Topic: मलाही जगायचय  (Read 1032 times)

Offline sammadival

  • Jr. Member
  • **
  • Posts: 75
  • Gender: Male
  • somnath madival
मलाही जगायचय
« on: September 09, 2015, 11:23:36 AM »
मलाही जगायचय

माहीत आहे मला अजून
मी जन्माला नाहि आले
तरीही आई - बाबा   
मलाही जीव आहे
                 
ठावूक आहे मुलगा
वाढवेल तुमचा वंश
पण हे विसरू नका
मी ही आहे तुमचाच अंश

मुला-मुलींत नका करु
असा भेदभाव
मी ही लावणार आहे
तुमचेच नाव

जेव्हा मी ही करेल
काम चांगल काही तेव्हा
सगळे तुम्हालाच विचारतील
तुमचीच मुलगी ना ही ?

तेव्हा तुम्हालाही वाटेल
माझा अभिमान
जेव्हा तुमच्या मुलीमुळे
वाढेल तुमची शान

आई-बाबा मला हे
जग पहायचंय
मलाही तुमच्यासोबत
सुखाने रहायचंय

मलाही जगायचय
मलाही जगायचय.

वीणा
9762282827

Marathi Kavita : मराठी कविता