ओस निर्जीव लक्तरांचा,वेग भरधाव होता
याच माळरानी तेव्हा,भावनांचा गाव होता
मी जाणतो दुश्मनाना,अन् साऱ्या वेदनाही
या पाठच्या वाराला,सोयऱ्याचा डाव होता
ती हिर्मसुन असते हल्ली, भकास बऱ्याचवेळा
इष्कात डूबल्या मनाचा , तिला अंदाज राव होता
मी धडपडतो जोडायला, तिच्या ओल्या जखमांना
वरल्या सुक्या टाक्यातही, खोल आरपार घाव होता
मी तारले इब्रतिला, जपले तिला जीवासी
जगाच्या लेखी प्रेमाचा, लुटण्याचा भाव होता
शब्द : अमोल अशोकराव पवार उम्ब्रज ता. कराड.
9967133576