Author Topic: काल स्वप्नात आली होतीस तू- - अमित जयवंत गायकर  (Read 1146 times)

Offline AMIT GAIKAR

  • Newbie
  • *
  • Posts: 34
                            काल स्वप्नात आली होतीस तू

काल स्वप्नात आली होतीस तू,
बनुनी अर्धांग माझं,
झाली होतीस माझं आयुश्य तू,
काल स्वप्नात आली होतीस तू!!
काल स्वप्नात आली होतीस तू!!

डोळे मिटुनी,
बघित होतो मी ती पहिली पहाट सोनेरी,
हळुवार येत होतीस नजरेस मज,
मंत्र मूग्ध आहे मी ,
बघुनी इंद्रायणी रूप तुज,
निद्रा माझी मोडुनी,
करीत आहेस देव अर्चना तू,
मोठ्यांचा मान राखुनी,
दिली होतीस संसाराला नवी साद तू,
काल स्वप्नात आली होतीस तू!!
काल स्वप्नात आली होतीस तू!!

रात्र सरली,
तशी ती माझ्या कडून वेळ हि हिरावली,
होत सार एक मृगजळ, एक स्वप्न ते,
सांग मग मला,
का दुखावलस हे मन,
काळ स्वप्नात येऊन तू!!
काळ स्वप्नात येऊन तू!!

                            ------ अमित जयवंत गायकर