Author Topic: प्रेम तराना  (Read 689 times)

Offline yogesh desale

  • Newbie
  • *
  • Posts: 15
प्रेम तराना
« on: September 21, 2015, 01:22:56 PM »
        Yogesh Desale:
          - योगेश देसले
       ( 9967682021 )
तू प्रेम दीवानी, 
मी प्रेम दिवाना,
दोघे गाऊया,
या दिलाचा तराना ।

ओढ भेटीची,
तुझ्या प्रितीची,
मला लाऊनी वेडं,
वाट बघते कशाची ।

तू जाऊ नको दूर,
माझा डोळ्याचा तू नुर,
तुझ्या अबोल्याने माझी,
वाढे हूर-हूर ।

मोत्याला शिंपल्याची,
साथ कशाला,
तुजं वीण मजं,
हवा श्वास कशाला ।

दिव्या विनं अंधारात,
जातो बगं तोल,
माझ्या आर्त हाकेचं,
गं तुला नाही मोल ।

आता तरी प्रिये,
तुझा अबोला तु सोड,
विनंतीला माझ्या,
तू मानुन घे गोड  ।

शब्दापरी माझा,
काही वाजे नाही ढोल,
माझ्या पिरतीची,
जाणून घे ओल ।

आता तरी बोल.....सखे
आता तरी बोल.....
प्रेमाचे दोन बोल,
आता तरी बोल.......।

Marathi Kavita : मराठी कविता