Author Topic: मावळतीचे सुर बरसती या पहा  (Read 402 times)

Offline yogesh desale

  • Newbie
  • *
  • Posts: 15
मावळतीचे सुर बरसती या पहा

मावळतीचे सुर बरसती या पहा,
शब्द या गंधात बुडवूनी पहा ।
सृष्टिच्या कागदा वरती रंग भरा,
अंतरीच्या मनाची साद ऐकुनी जगा ।।

का भुलवसी माझ्या मनाला प्रियकरा,
नयनांनी ओठींचे काम करा ।
मावळतीचे सुर बरसती या पहा...

काळोखाच्या आगमनाची ओढ मना,
तुज भेटण्याची आस का लागी मला।
 मावळतीचे सुर बरसती या पहा.....
    . - योगेश देसले