Author Topic: नाद  (Read 613 times)

Offline yogesh desale

  • Newbie
  • *
  • Posts: 15
नाद
« on: September 22, 2015, 11:06:40 AM »

             नाद

नाद नीनादे कर्णपटलावरी,
शब्द जव तुझ्या ओठी येती,
मन माझे होय बावरे,
केशंभार तू जेव्हा सावरे ।

उमलुनीया कळी फुलाची,
मध चाखतो भ्रुंगरजी,
हळूच मिटता कोवळी पाकळी,
जीवाशी जातो अवकाळी ।

का लागले मज हे वेड,
आंबट-तिखट की गोड,
वर्षाव तुझा की खोड,
तरी लागली मज तुझा ओढ  ।
      - योगेश देसले

Marathi Kavita : मराठी कविता