Author Topic: बाबा, तुमच्या हृदयातील एक कप्पा..............  (Read 1804 times)

Offline sindu.sonwane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 98
  • Gender: Female
 बाबा
तुमच्या हृदयातील एक कप्पा.............


हळव्या भावनेने कठोर मनात
जपून ठेवली तुमच्या माझ्या नात्याची वीण
सहज न तुटणार ती तुमच्या माझ्या विश्वासा बिन
ऋणानुबंधाच बांध असला जरी समोर
तरी कसे हो विसरू मी माझ्या
भोवतीचे तुमच्या प्रेमाचे कुंपण
कधी फुलांची बाग बनते तर
कधी काटेरी झुडूप होते
दुरावा आपल्या दोघात नाहीच आहे
आहे ती फक्त विचारांची तफावत
कळते हो मलाही तुमच्या मनातली व्यथा
आणि हीच व्यथा मला नकोशी होते
अगदी खरच सांगायचं झाल तर मनातून सांगते
“मला फक्त तुमच्यावर
विसंबून राहायचं आहे अगदी शेवट पर्यंत”
नका विचार करू कि कोण माझी साथ देईल
साथ तुमची आयुष्यभर मिळू द्या
हीच फक्त त्या देवाला शपथ घाला
मध्येच नका हो असे म्हणत जाऊ
कि, नाही सोबती तुझ्या उद्याच्या दिवसाचे आम्ही
तुमच्या हातातून हात कधी माझा ना सुटो
घट्ट पकडलेल्या हातातून अलगद जरी
तुमचा हात निसटला
चूक न ती माझी न तुमची
आज्ञा फक्त मला त्या परमेश्वराची समजा
कोण माझे कोण तुमचे
नाहीच करत मी हा विचार
मनात माझ्या अजून नाही कोणी तुमच्या विन जवळचे
परमेश्वर हि तुम्हीच, गुरु हि माझ्यासाठी तुम्हीच
जीवनाचा अर्थ नाही कळला मला अजूनही
पण जीवन जगणे शिकले शेवटी तुमच्या कडूनच
म्हणूनच म्हणते बाबा,
“शरीराच्या वेदनांना माझ्या
मनातल्या वेदना नका बनू देऊ”
शरीर जरी कमजोर झाले माझे
मनानी मला मात्र तटस्थ राहू द्या
मनोबल शेवटी तुम्हीच माझे
इच्छा फक्त एकच माझी
माझ्याकडून होऊ द्या शेवट पर्यंत सेवा तुमची
नाही मला स्वर्गाची इच्छा
नाही मला संसार सुखाची अपेक्षा
मनोमानीची फक्त एकाच आकांक्षा
माझ्या हातून घडो तुमच्या दुखांचा नायनाट
शेवटी एकच म्हण्याच आहे
चुकांना माझ्या ओंझळीत घाला
पुन्हा नको मजपाशी
दुराव्यांचे शब्द आणा
आदरतिथ्य माझ्या मनीचे तुमच्यासाठी
नाही सामावणार या चार ओळीत
कवितेत माझ्या एवढ्याश्या तुम्ही सामावणार
एवढी तुमची महती लहान नाही.   
                      सिंदू
« Last Edit: October 05, 2015, 12:08:43 PM by sindu.sonwane »

Marathi Kavita : मराठी कविता


ajit br

  • Guest
khup, khup, khupach chhan!

shradha ravindra palkar

  • Guest