Author Topic: का येत आहे आठवण तुझी? -----------अमित जयवंत गायकर  (Read 2033 times)

Offline AMIT GAIKAR

  • Newbie
  • *
  • Posts: 34
आज का येत आहे आठवण तुझी,
डोळ्यां भोवती येत आहेत त्या रजनी वेळी च्या भेटी,
होत आहेत वेदना असह्य,
तरी,
आज का येत आहे आठवण तुझी?

मोडलस तू भावनांना,
असंख्य आसवांना आणि नादान मनाला,
होत आहेस कठोर तू,
तरी,
आज का येत आहे आठवण तुझी?

कोट्यवधी पाऊल दूर तू,
लक्श्यावधी अंतर आहे दोघात,
माहीत आहे मज,
येणार नाहीस तू हाकेला एक ही,
तरी,
का येत आहे आठवण तुझी?
का येत आहे आठवण तुझी?

                          ---------------अमित जयवंत गायकर