Author Topic: आज कशी तुला माझी आठवण आली...  (Read 1389 times)

Offline Ravi Padekar

  • Jr. Member
  • **
  • Posts: 146
  • Gender: Male
  • प्रयत्न लिहिण्याचा, स्वतः ला व्यक्त करण्याचा...
आज कशी तुला माझी आठवण आली
मोबाइलवर पहिलं तर तुझा मेसेज आला सकाळी
बघून न बघितल्यासारखं करायचीस एकेकाळी
पण आज कशी तुला माझी आठवण आली...

दूर दूर राहून,
का वाढवला तू दुरावा
मला कंटाळून,
तुला बहुतेक एकांत हवा

तुझ्या हृदयामध्ये,
नव्हती प्रेमाची जागा खाली
आज कशी तुला माझी आठवण आली

एकदा बोलायला लागलीस,
की कधी न थांबायचीस
आणि माझे दोन शब्द सुद्धा,
शांत ऐकत बसायचीस

गोष्ट होती आपली, त्या वेळची ती निराळी
पण आज कशी तुला माझी आठवण आली...

मैत्री होती फक्त,
तरी दिशा आपल्या चुकल्यात
आठवणीशी जगून,
भेटी आधुर्‍या राहिल्यात...

इतके दिवस झाले, का मला तू विसरलेली
आज कशी तुला माझी आठवण आली...

मला यायला उशीर झाला
तर वाट बघत बसायचीस,
तुझ्या वाट बघण्याने आता
कुठेच तू ना दिसायचीस...

आज कशी तुला माझी आठवण आली...
स्वप्न चांगले रंगले
तेवढ्यात आईने हाक दिली,
झोपेतून उठलो तर बघितलं,
बाहेर पहाट झालेली...!!!

                                                             कवि:- रवी सुदाम पाडेकर
                                                             घाटकोपर, मुंबई
                                                             मो- 8454843034.