Author Topic: मंद मंद वाहतोस का रे? समीर अधीर होऊनी...  (Read 492 times)

Offline sameer3971

  • Newbie
  • *
  • Posts: 40
मंद मंद वाहतोस कारे?
समीर अधीर होऊनी
चित्त चोरीलेस तु कसे?
स्वप्न खुळी ती दाऊनी..

भाळावरच्या बटेस कारे?
झुलविलेस तु चोरूनी
चित्र काढीलेस तु कसे?
सजीव ते ह्या लोचनी..

थरथर ती ओठांत का रे?
चूंबिलेस हळूच स्पर्शूनी
सूर ते जुळवीलेस कसे?
गीत जीवनाचे गाऊनी...

रीती रीती मी कशी?
प्रेमाने तुझ्या मी भारली
आयूष्य हे अधूरेच का रे?
पुर्ण आहे मी जाहली...

अनामिक ती प्रीत कशी?
ओढ अंतरीची जाणीली
मंद मंद वाहतोस का रे?
समीर अधीर होऊनी...

 समीर बापट
मालाड, मुंबई.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,417
  • Gender: Male
  • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!