Author Topic: प्रेम  (Read 1342 times)

Offline nileshjoshi5

  • Newbie
  • *
  • Posts: 4
प्रेम
« on: October 30, 2015, 07:56:47 AM »
                     ~ प्रेम~

माझे प्रेम तुझ्यावरती
तुच माझ्या मनावरती

राञी झोपेत माझ्या
स्वप्न आपुले तरंगती

आपण दोघे चंद्रारती
लाख चांदण्या आपुल्या भोवती

सारी दुनिया पृथ्वीतळावरती
सारे ब्रम्हांड आपुल्या सभोवती

ग्रह तारे चमचम करती
जसे पक्षी किलबील करती

रोमहर्ष घडवी लुकलुक तारा
जसा थंड हवेचा झुळुक वारा

प्रेमाच्या वेली फुलत जाती
सुखी क्षण बहरत जाती

तेहतीस कोटी आपुल्या प्रेमाचे गुणगाण गाती
आपण दोघे स्वर्ग सुख भोगती
आपण दोघे स्वर्ग सुख भोगती

       -©R  निलेश ल. जोशी
« Last Edit: October 30, 2015, 04:10:41 PM by nileshjoshi5 »

Marathi Kavita : मराठी कविता