बायकोचा फोन आला की
ह्यांच्या कपाळावर आठी पडते
आणी बायकोची ह्यांच्या विषयी काळजी
त्या आठीखाली थिती पडते
बायकोचा फोन म्हणजे डोक्याला ताप
बायकोच प्रेम तरीही नवर्यावर अमाप .
तिलाही असत ऑफिस , तिलाही असतात मीटिंग
मित्रांसाठी करता येतात ह्यांना सेत्तिंग
आणी बायकोने लवकर बोलावल्यावर असत
मात्र ऑफिसमध्ये late sitting.
बायकोचा फोन म्हणजे
नको ती कटकट
तिचे प्रश्न म्हणजे
फुकटची वटवट .
तिच्या प्रश्नांमध्ये असते
त्याच्या विषयीची काळजी सत्वात ,
पण कधीच तिच्या मनाची व्यथा
त्याला नाही जाणवत .
लग्नाच्या दिवसापासून
त्याच्या घराला माणसाना ती आपल मानते ,
त्या बदल्यात त्याचा थोडासा वेळ तर मागते ,
त्याच्या शिवाय नसत तीच कोणी जवळच ,
पण ह्याला नसत कधीच तीच मन जाणून घ्याच ,
लग्न व्हायच्या आधी असतो
त्याच्याकडे बराच वेळ ,
आणी आता बायकोचा फोन उचालायालाही
नसतो ह्याच्याकडे क्षणाचा वेळ .
मित्रांशी मारू शकतात तासंतास गप्पा
बायकोशी बोलायचं म्हटलं की लगेच येतात झोप .
ती एकटीच आपल्या व्यथा सांभाळत राहते ,
ठाकला असेल तो म्हणून केसांमध्ये हात फिरवते .
तिच्याकडे पाठ करून
तो शांत झोपून जातो
त्यांच्यामधला हा दुरावा
तिला मात्र सलत राहतो .
रोजची सकाळ नवी असली तरी
कालच्यासारखीच असते .
त्याच्यासाठी कटकट असली तरी
हिला मात्र त्याला फोन करण्याची घाई असते .